मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

उपमुख्यमंत्र्यांपुढे आदिवासींची घोषणाबाजी

Tuesday, 12th August 2014 01:59:15 AM

गडचिरोली, ता.१२ : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे गडचिरोली येथे आले असता आज(ता.१२) सर्किट हाऊसमध्ये आदिवासी युवक, युवतींनी जोरदार घोषणाबाजी केली.

अजित पवार सर्किट हाऊसमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच अनेक आदिवासी युवक, युवती तेथे गोळा झाले होते. त्यांनी सर्किट हाऊस व बाहेर पेसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, हम सब एक है  अशा व आरक्षणासंदर्भात घोषणा दिल्या़ त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश कुठल्याही परिस्थितीत करू नका, अशी विनंती आदिवासी युवकांनी केली. यावर आदिवासी समाजाला लागू असलेले आरक्षण इतर कोणत्याही जातीच्या लोकांना दिले जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री आऱआऱपाटील हेही उपस्थित होते. शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, बिरसा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन मसराम, गुलाब मडावी, गंगाधर मडावी, रोहणी मसराम यांच्यासह शेकडो तरुण व तरुणी उपस्थित होत्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EYNC8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना