गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

खोब्रामेंढा जंगलात चकमक; दोन नक्षली ठार

Monday, 11th August 2014 10:54:38 PM

गडचिरोली, ता. १२ : सी-६० पथकाचे जवान खोब्रामेंढा-मालेवाडा परिसरातील जंगलात नक्षलविरोधी जवान अभियान राबवीत असताना आज (ता. १२)  गेल्या सकाळी नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षली ठार झाल्याचे वृत्त आहे.  

सी-६० पथकाचे जवान खोब्रामेंढा व मालेवाडा परिसरातील जंगलात गस्तीवर असताना सशस्त्र नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली जंगलात पसार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांचे दोन मृतदेह ताब्यात घेतले असून, एसएलआर व थ्री नॉट थ्री बंदूकही सापडली आहे. चकमकस्थळी आढळलेल्या रक्ताच्या डागावरून आणखी काही नक्षली ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
F5UAZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना