शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पेट्रोलपंप बंदचा वाहनधारकांना फटका

Monday, 11th August 2014 05:07:13 AM

गडचिरोली, ता. ११ : शासराने पेट्रोल व डिझेलवर एलबीटी लागू केल्याच्या विरोधात पेट्रोल डिलर असोसिएशनने आज (ता. ११) एक दिवस बंद पुकारल्याने जिल्हाभरातील वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली.

शासनाने पेट्रोल व डिझेलवर एलबीटी (स्थानिक संस्था कर) आकारल्याने महाराष्ट्रात ५ ते ६ रुपये अधिक दराने पेट्रोल विकावा लागत आहे. याचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे़ एकीकडे सोने अत्यावश्यक नसतानाही त्यावर अत्यंत कमी एलबीटी आकारला जातो, तर पेट्रोल व डिझेल अत्यावश्यक घटकात मोडत असतानाही त्यावर जास्त एलबीटी आकारण्यात आला आहे़ याविरूद्ध महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनने आज एक दिवसीय बंद पुकारला होता. यामुळे गडचिरोली शहरासह आरमारी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, अहेरी, चामोर्शी इत्यादी ठिकाणचे पेट्रोलपंप  बंद होते. यामुळे प्रवासी वाहतूक करणा-या खासगी गाड्या व मोटारसायकल आणि कार मालकांनाही नियोजित स्थळी जाता आले नाही.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ZZDS4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना