गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चौडमपल्लीजवळ अपघात; एक ठार, दोघे जखमी

Sunday, 10th August 2014 06:37:59 AM

 
गडचिरोली, ता़१०
मालवाहू वाहनाने विरूध्द दिशेकडून येणाºया  मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने  एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आज रविवारी (ता.१०) दुपारी २ वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली गावाजवळ घडली. डोमाजी पेंदोर (३०) रा.खरारपेठ, ता.गोंडपिपरी (चंद्रपूर) असे मृत इसमाचे नाव आहे, तर रोहिदास मारोती वेलादी (३०) रा.गांधीनगर (घोट) व मालवाहू वाहन चालक नाशिक लवंगू मडावी (३०) रा.सुरगाव, ता.गोंडपिपरी  हे जखमी झाले़ रोहिदास वेलादी यांची प्रकृती गं•ाीर असून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
डोमाजी पेंदोर व रोहिदास वेलादी हे एम.एच.३३-के-०१२७ क्रमांकाच्या मोटारसाकलने  आष्टीवरून आलापल्लीकडे जात होते. चौडमपल्ली गावाजवळ विरूध्द दिशेने येणाºया  एम.एच.३४- एबी-४९८२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गं•ाीर जखमी झाले.  पेंदोर याचा आष्टी येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वेलादी हे गं•ाीर जखमी झाल्याने  त्यांना आष्टी येथे प्रथमोपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. या अपघातात मालवाहू वाहन चालक नाशिक लवंगू मडावी हा किरकोळ जखमी झाला. त्याला आष्टी येथील रूग्णालयात •ारती करण्यात आले. मालवाहू वाहन  गोंडपिपरी येथील गौरकार हार्डवेअर यांच्या मालकीचे आहे.  अपघातस्थळ अहेरी पोलिसांच्या हद्दीत असल्याने अहेरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. घटनास्थळ आष्टी पोलिस हद्दीच्या जवळ असल्याने आष्टी पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी मदत केली.
 
 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TUW0O
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना